डुडुळगाव : दत्तनगर, डुडुळगाव येथे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी छापा घातला. यावेळी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी आवश्यक असणारा 16 लाख 91 हजार 400 रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.
या मध्ये 2 हजार 988 किलो गूुळ, 2 हजार 150 किलो नवसागर याचा समावेश आहे.
गणेश जीवन मन्नावत (वय 25, रा. सुभाषवाडी, निघोज ता.खेड) व मोहनलाल रत्नाराम देवासी (वय 42, रा. आळंदी ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.एक जण पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अतक करण्यात आलेल्या दोघांवरही विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेहळणी करत असताना दत्तनगर, डुडुळगाव येथे संतोष वहिले यांच्या पत्र्याच्या शेडसमोर दोन बोलेरो पिकअप व एक टियागो कारमध्ये हातभट्टीची दारु व दारु तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल घेऊन काहीजण थांबले असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी त्यानुसार तेथे छापा घालून आरोपींना ताब्यात घेतले त्यावेळी तिन्ही गाड्यांमध्ये 35 लिटर मापाचे प्लॅस्टीकचे कॅन, गुळाच्या ढेपा व नवसागर भरलेली पोती असा एकूण 16 लाख 91 हजार 400 रुपये किंमतीचा माल आढळून आला.
गावठी दारूसाठी लागणारा कच्चा माल जप्त; दोघे अटकेत
Reviewed by ANN news network
on
२/०५/२०२२ ०९:५७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: