Police e news

महाळुंगे येथे दुचाकीचोर अटकेत

पिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्यास एका चोरट्यास चैनी करता मोटार सायकल चोरणार्या चोरटयास महाळुंगे पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कानिफनाफ विश्वनाथ घनवटे ( वय 32 वर्षे, रा- शिवसाईनगर, गल्ली नं.1, दिघी, ता.हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. औद्योगिक वसाहती मधील मालमत्ता चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वारंवार गुन्हे घडणारे ठिकाणचे गुन्हे प्रवण क्षेत्र म्हणुन क्राईम मॅपिंग तयार करण्याची सुचना दिल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी महाळुगे पोलीस चौकीचे गुन्हे शोध पथकाचे स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग व स्टाफला हद्दीतील वारंवार मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडणारे ठिकाणांनाची माहिती घेवुन, कोणत्या दिवशी व वारी, वेळी चोरी होतात याचा अभ्यास करुन त्या ठिकांनावर पाळत ठेवुन कारवाई करण्याची सुचना दिली. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुळीग, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर आणि महाळुगे वाहतूक विभागाचे भवारी हे एच.पी.चौक महाळुंगे येथे नाकाबंदी करुन वाहनतपासणी करीत असताना त्यांना एका दुचाकीस्वाराचा संशय आला. त्यामुळे त्याची चौकशी केली असता त्याने ती दुचाकी वराळे गावामधून चोरल्याचे सांगितले. त्या दुचाकी चोरीबाबत महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास करता आरोपीने दुचाकीचोरीचे आणखी 3 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 04 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
महाळुंगे येथे दुचाकीचोर अटकेत महाळुंगे येथे दुचाकीचोर अटकेत Reviewed by ANN news network on २/०५/२०२२ ०९:५५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.