लोणावळा : ओडिशामधून अपहरण करून मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे डांबून ठेवण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुटका केली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. 6 फेब्रुवारी पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना या अपहरण झालेल्या मुलीबद्दल कळवले. ओडिशा येथील सिमुलीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण करण्यात आलेल्या 17 वर्षांच्या मुलीला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंबरे येथे एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले आहे. तिची सुटका करा असा आदेश देशमुख यांनी मोरे यांना दिला होता. या आदेशानुसार पोलीस निरिक्षक प्रवीण मोरे यांनी उपनिरिक्षक सचिन बनकर, सहायक फौजदार बोकड, हवालदार जांभळे, महिला हवालदार घुगे यांचे पथक तयार केले. या पथकाने नवलाख उंबरे येथे पोहचून तेथील स्थानिकांच्या मदतीने त्या मुलीला एका बंद खोलीतून ताब्यात घेतले. त्यानंतर या बाबत स्थानिक पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी तळेगांव दाभाडे यांना माहिती दिली.
त्या मुलीला बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. सध्या तिला चैतन्य महिला आश्रम, मोशी याठिकाणी सुखरूप ठेवण्यात आले आहे. सदरची माहिती ओडिशा येथील संबंधित पोलिस ठाण्यात कळविण्यात आले आहे.
ओडिशातून अपहरण करून आणलेल्या मुलीची सुटका
Reviewed by ANN news network
on
२/०७/२०२२ ०९:०४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: