पिंपरी: वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असलेल्या तपास पथकाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांची चौकशी केली असता ते सराईत घरफोडे असल्याचे आढळून आले. यापैकी एक अल्पवयीन आहे अटक करण्यात आलेल्या सज्ञान चोराने शहरात सहा ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले आहे या गुन्हेगाराकडून चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन्स आणि दुचाकीचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वप्निल उर्फ मायकेल शंकर गुळवे (वय वीस वर्षे, राहणार- लिंक रोड, पत्राशेड, 3 स्मशानभूमीजवळ, चिंचवड, पुणे) असे आहे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शहरातील घरफोडीचे गुन्हे कमी व्हावेत म्हणून आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर यांनी वाकड पोलिस ठाण्यातील अधिकारी वर्गाला तशा सूचना दिल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.त्यांना वाकड पोलिस ठाण्यात आणून तपास केला असता त्यांनी ही दुचाकी वापरून शहरात 6 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिसहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिनित जाधव यांनी दोन पथके तयार करून वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे कमी व्हावेत म्हणून गस्त घालण्यास सुरुवात केली होती. गस्त सुरू असताना पोलीस अंमलदार प्रकाश प्रशांत गिलबिल व अतीक शेख हे प्रसूनधाम रस्ता, गंगा अशियाना सोसायटी जवळ आले असता त्यांना एका दुचाकीवर दोघेजण जाताना दिसले त्यांची तपासणी करण्याकरिता त्यांना थांबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता ते न थांबता पळून जाऊ लागले. ली.
ही कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, रामचंद्र पाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणेश तोर्गल, सहाय्यक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार जावेद पठाण, बापूसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक सावळे, पोलीस नाईक बंधू गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतीक शेख, प्रशांत गिलबिले, विक्रांत चव्हाण, पोलीस शिपाई कल्पेश पाटील,कौंतेय खराडे, पोलीस कॉन्स्टेबल अजय फल्ले यांनी केली
सराईत घरफोड्या अटकेत; चार लाखांचा मुद्देमाल जप्त! वाकड पोलिसांची चमकदार कारवाई
Reviewed by ANN news network
on
३/०९/२०२२ १०:५४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: