पिंपरी :- डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तीना बरोबर घेऊन रंगांची उधळण करणारा धूलिवंदनाचा सण पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आनंदात साजरा केला.दृष्टिहीन व्यक्तीकडे दृष्टी नाही मात्र दूरदृष्टी आहे.रंगांची ओळख नसली तरीही या व्यक्ती आयुष्यात सप्तरंग भरत असतात.यासाठी आपण त्यांच्या कडून खुप काही शिकायला हवे व पर्यावरण पुरक होळी व रंग पंचमी हे सण साजरे करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. चिंचवड मधील पोलीस आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आस्था हँडीक्राफ्ट्स मधील दृष्टिहीन बांधव या वेळी उपस्थित होते.अमृता क्षेत्रे या विद्यार्थिनीने प्रार्थनेतून सर्वांना मंत्र मुग्ध केले. दृष्टिहीन असलेल्या संदीप भालेराव,अशोक जाधव,तृप्ती भालेराव,गोरख घनवट यांनी आपल्या सुरेल आवाजात गेलेल्या गाण्यानी कार्यक्रमाची रंगत वाढविली.कृष्ण प्रकाश यांनी रंगांची ओळख देत सर्व दृष्टिहीन व्यक्तिच्या चेहऱ्यावर रंग लावले.या मुळे भावुक झालेल्या दृष्टिहीन व्यक्तीनी आयुक्तांना रंग लावत शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी दृष्टिहीन कल्याण संघाच्या संतोष राऊत याने आपले मनोगत व्यक्त केले. डोळ्यांची काळजी घेण्याबाबत पर्यावरण पुरक होळी खेळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.दृष्टी नसणे ही मोठी खंत आहे.मात्र आयुष्यात दुरदृष्टी ठेऊन यशस्वी व आनंदित राहता येते हे उदाहरण आज समोर असल्याचे त्यांनी सांगितले.रंगांची उधळण करीत मोठ्या आनंदात आज पोलीस अधिकारी व कर्मचारी रंगात न्हाउन निघाले.सूत्र संचालन आस्था हँडीक्राफ्ट्स चे अध्यक्ष पराग कुंकुलोळ यांनी केले.सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दृष्टिहीन बांधवांसह धूलिवंदनाचा आनंद लुटला (video)
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२२ १०:३५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२२ १०:३५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: