Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि.26 सप्टेंबर 2022

फेसबुकवरील मित्राने केली फसवणूक हिंजवडी : फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने बावधन येथील एका नागरिकाला 58 लाख 78 हजार रुपयांचा गंडा घातला.हा प्रकार 22 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत घडला. या प्रकरणी शाम अरविंद ओझरकर (वय 54 , रा. पाटीलनगर, बावधन) यांनी याप्रकरणी रविवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून डॉ. विल्यम अल्बर्ट, 0589200100000661 खातेधारक, 7042136239, 8130318145 या मोबाईलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विल्यम याच्या सोबत फिर्यादी ओझरकर यांची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. विल्यम याने तो पर्यटनासाठी भारतात आला असून त्याच्याकडे प्रमाणापेक्षा अधिक डॉलर आहेत. त्यामुळे त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.त्याला ओझरकर यांच्या मदतीची गरज आहे, असे सांगून त्याने ओझरकर यांची दिशाभूल केली. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल 58 लाख 78 हजार 700 रुपये घेत फसवणूक केली. ----------------------------- मोटार घेऊन चालक पसार वाकड : गजानननगर, रहाटणी येथील एका मोटारमालकाने मोटारीवर चालक म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने मोटारीसह मोबाईल लांबवल्याची तक्रार वाकड पोलिसठाण्यात दिली आहे. हा प्रकार 23 सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी पांडुरंग पुंडलिक जगताप (वय 44, रा. गजानननगर, रहाटणी) यांनी सोमवारी तक्रार दिली आहे. त्यावरून संतोष कांबळे (वय 35) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मोटारीवर आरोपी चालक म्हणून काम करत होता. तो फिर्यादींची मोटार क्रमांक एमएच 14/जीयू 5734 आणि मोबाईल फोन घेऊन 23 सप्टेंबर रोजी दुपारी निघून गेला. तो परत न आल्याने फिर्यादीने त्याच्या विरोधात तक्रार दिली. --------------------------- सदनिका न देता महिलेची फसवणूक हिंजवडी : बावधन खुर्द येथे 24 एप्रिल ते 25 सप्टेंबर या कालावधीत एका महिलेची करारानुसार सदनिका न देता 13 जणांनी तिला एक कोटी रुपयांना फसविले. याबाबत तिने जाब विचारला असता तिचा विनयभंग केला. याप्रकरणी त्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून सुहास लुंकड, मिलिंद लुंकड, संजय लुंकड, दीपक भटेवारा, मयूर पाटील, राजीव गंभीर, प्रशांत गाढवे, विजय मुरकुटे, सुपरवायझर काळे, दोन महिला आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी बनावट नकाशा तयार केला. ती विकत घेणार असलेली सदनिका तशीच असणार असल्याचे भासविले. बनावट नकाशा आणि करारनामा करून फिर्यादीला 1 कोटी 3 लाख 14 हजार 445 रुपयांना फसविले. याबाबत फिर्यादीने जाब विचारला असता सुपरवायझर काळे आणि एका अनोळखी रंगार्‍याने धमकी देऊन तिचा विनयभंग केला.. --------------------------------- महिलेचे मंगळसूत्र हिसकावले रावेत : मुंबई पुणे महामार्गावर समीर लॉन्सनजिक रविवारी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. या प्रकरणी त्या महिलेने रावेत पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे 40 हजारांचे मणी मंगळसूत्र, 5 तोळे वजनाचे 2 लाख रुपयांचे मंगळसूत्र असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये वजनाचे दागिने हिसकावून नेले. --------------------------- सराफाला गंडा घातला वाकड : वाकड येथील सराफाला बनावट सोने विकून त्याची फसवणूक करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी रात्री शिवनेरी ज्वेलर्स, वाकड येथे घडला. या प्रकरणी राजकिरण पोपट पाटील (वय 40, रा. वाकड) यांनी रविवारी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून एक महिला (रा. गजानन महाराज मंदिर मठ, आळंदी), सुरज पांडुरंग निरपाल (वय 22, रा. औसा रोड, लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मुलाच्या उपचारासाठी तातडीने पैसे पाहिजे असे कारण आरोपी महिलेने व्यंकटेश ज्वेलर्स, लातूर येथून सोने खरेदी केल्याची पावती दाखवली आणि 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार देऊन फिर्यादीकडून 30 हजार रुपये घेतले. हा हार नकली आहे, हे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली. -----------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.26 सप्टेंबर 2022 संकलित गुन्हे वृत्त दि.26 सप्टेंबर 2022 Reviewed by ANN news network on ९/२६/२०२२ ०२:११:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.