Police e news

चिंचवड : दवाबाजारातील खुनाचा तपास सुरू; एका आरोपीची ओळख पटली

चिंचवड : दवाबाजार, चिंचवड येथे शनिवारी रात्री एका तरुणाचा दगदाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीची ओळख पटली असून त्याच्या साथीदाराची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी मृत सागर कांबळे याच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून सहदेव उर्फ सद्या सरवदे (रा. आनंदनगर, चिंचवड) व अनोळखी व्यक्ती या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघेजण सागर सोबत दिसून आले. आठवड्याभरापूर्वी सागरने एका मुलीची छेड काढल्यामुळे त्याला मारहाण झाली होती. त्याला दारूच व्यसन होते. रात्री सागरसह आरोपी कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. तिथे त्यांचा वाद झाला. दोघांनी त्याला सुरुवातीला सोसायटीच्या पार्किंगमध्ये मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्याला सोसायटी समोरील अंगणात भिंतीजवळ आणले आणि दगडाने त्याचे डोके ठेचले.
चिंचवड : दवाबाजारातील खुनाचा तपास सुरू; एका आरोपीची ओळख पटली चिंचवड : दवाबाजारातील खुनाचा तपास सुरू; एका आरोपीची ओळख पटली Reviewed by ANN news network on ९/२६/२०२२ ०२:१३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.