Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि.30 सप्टेंबर 2022

जमीन व्यवहाराच्या बहाण्याने महिलेचे शोषण देहुरोड : देहुरोड येथील एका महिलेला आणि तिच्या मुलीला गायब करण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने जमीन खरेदी करावयास लावून त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करणार्‍या एकासह अन्य दोघांवर देहुरोड पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 10 जुलै 2021 ते 6 जून 2022 या काळात घडला. या प्रकरणी त्या महिलेने गुरुवारी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून प्रदिप फक्कड कोळी (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) व देवा विलास सोनावणे (वय 32 रा. वडगाव मावळ) यांना अटक करण्यात आली असून अंकुश सोनावणे याच्या विरोधातही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. फिर्यादीला आरोपी कोळी याने पवनानगर येथील जमीन घेणे भाग पाडले. त्यासाठी त्याने फिर्यादीला ती जमीन चांगली आहे तुझी एफडी मोडून ती विकत घे, तसेच तुझ्यात माझ्यात जे झाले ते कोणाला सांगू नको,नाही तर तुला व तुझ्या मुलीला पुढे मागे कोणी नाही एकेदिवशी गायब करेन अशी धमकी दिली. फिर्यादीला दाखविण्यात आली एक जमीन आणि प्रत्यक्षात विकत दुसरीच दिली. त्यामुळे फिर्यादी जानेवारी 2022 मध्ये अंकुश सोनावणे याच्या घरी व त्याला विचारले की मला एक जमीन दाखवली व दिली दुसरी असे का, त्याने हे सर्व व्यवहार कोळी बघत असल्याचे सांगीतले. त्यानंतर कोळी सतत फिर्यादीच्या घरी येऊ लागला. त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवूनशारीरिकसंबंध प्रस्थापित केले. तिच्याकडून जमिनीच्या व्यवहाराचा बहाणा करून सुमारे 66 लाख रुपये उकळले. ----------------------- महिलेवर अत्याचार करून ठार मारण्याची धमकी चिंचवड : महिलेवर अत्याचार करून तिला पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी देणार्‍या एकास पोलिसांनी अटक केली.हा प्रकार 2017 पासून सुरु होता. या प्रकरणी त्या महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून राजेंद्र शेषराव शिंदे (वय 42 रा.पुनावळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. 2017 सालापासून आरोपी याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्न नकरता फसवणूक केली. फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार करणार हे समजताच आरोपीने फिर्यादीला पोलीसात तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिली. --------------------------- जमीन खरेदी केली म्हणून मारहाण भोसरी : मोशी येथील दोन महिला आणि एका ज्येष्ठ नागरिकाला जमीन खरेदी केली म्हणून पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी गोरखनाथ बाळासाहेब सस्ते (वय 39 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विष्णू बाबूराव सस्ते (वय 55),शिवाजी बाबूराव सस्ते (वय 57),दिगंबर शिवाजी सस्ते (वय34),अक्षय ऊर्फ आकाश सस्ते (वय 26) व रविंद्र मारूती सस्ते (वय 45) सर्व राहणार मोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने एका महिलेकडून मोशी येथील गट क्रमांक 244 मध्ये 15 गुंठे जमीन विकत घेतली. तुम्ही ती जमीन का खरेदी केली असे विचारत आरोपींनी फिर्यादीचे वडील बाळासाहेब दशरथ सस्ते, फिर्यादीची पत्नी व बहिण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या वडिलांना काठीने मारून जखमी केले. ------------------------------- बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल काळेवाडी : सदनिकाधारकांच्या परवानगीशिवाय बांधकामात बदल केला. सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन केली नाही आणि सदनिकाही खरेदीदारांच्या नावे करून दिल्या नाहीत. या कारणावरून बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकार सन 2005 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत काळेवाडी येथे घडला. कुट्टन नानू नायर (वय 53, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आनंद डेव्हलपर्सचे राजेंद्र अनंतकुमार बिजलानी आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अमृतधाम सोसायटीचे नकाशे, तपशील जाहीर केले. त्यातील फ्लॅट फिर्यादी आणि इतर सभासद घेण्यासाठी तयार झाले. त्यानंतर ग्राहकांच्या संमतीशिवाय आरोपींनी सोसायटीच्या बांधकामात फेरबदल केले. सोसायटी स्थापन केली नाही. सदस्यांकडे जमिनीतील व इमारतीमधील हक्क, मालकी हक्क व हितसंबंध यांचे हस्तांतर न करता दस्तऐवज करून न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. -------------------------------- कारखान्यातून 14 लाख रुपयांच्या सुट्या भागांची चोरी महाळुंगे : महाळुंगे येथील एका कारखान्यातून चोरट्यांनी 19 सप्टेंबर रोजी रात्री 14 लाख रुपयांचे सुटे भाग चोरून नेले. बी एम डी इंजिनिअरिंग या कारखान्यात हा प्रकार घडला. गोकुळ ज्ञानेश्वर भिसे (वय 29, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा महाळुंगे येथे कारखाना आहे. सोमवारी रात्री पावणेनऊ ते मंगळवारी सकाळी साडेआठ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उघड्या पत्र्याच्या शेडमधून 14 लाख 4 हजार 500 रुपये किमतीचे 107 सुटे भाग चोरून नेले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत. --------------------------------- ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने फसवणूक नवी सांगवी : नवी सांगवी येथे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर परतावा मिळेल असे आमिष दाखवून दोघांनी एकाला 23 लाख रुपयांना फसविले. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला. रणजित महादेव ढोमसे (वय 40, रा. नवी सांगवी) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून रोहन शहा, राहुल मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर 40 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीला टप्प्याटप्प्याने 23 लाख रुपये गुंतवणूक करण्यास आरोपींनी भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा दिला नाही. ------------------------------- ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने फसवणूक नवी सांगवी : नवी सांगवी येथे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर परतावा मिळेल असे आमिष दाखवून दोघांनी एकाला 23 लाख रुपयांना फसविले. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला. रणजित महादेव ढोमसे (वय 40, रा. नवी सांगवी) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून रोहन शहा, राहुल मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर 40 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीला टप्प्याटप्प्याने 23 लाख रुपये गुंतवणूक करण्यास आरोपींनी भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा दिला नाही. ------------------------------- कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक चिंचवड : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने चिंचवड येथे एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली असून त्याला 4 लाख रुपयांना ठकविण्यात आले आहे. हा प्रकार 30 सप्टेंबर 2020 ते 27 सप्टेंबर 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडला. या प्रकरणी डॉ. विकास अजित एच. (वय 50, रा. पाषाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चोलन मुदलियार, जयशंकर (पूर्ण नाव माहिती नाही)याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची चिंचवड येथे अवनीरा बायोटेक ही कंपनी आहे. त्याला व्यवसायवृद्धीसाठी पैशांची गरज होती. आरोपीने फिर्यादीला कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी फिर्यादीकडून चार लाख रुपये घेतले. कर्ज मंजूर करून दिलेच नाही. ------------------------------- कोरे धनादेश घेऊन फसवणूक वाकड : डांगे चौक, वाकड येथे कर्ज देण्याच्या बहाण्याने कोरे धनादेश घेऊन एकाची तिघांनी फसवणूक केली. हा प्रकार 4 मे 2019 ते 29 सप्टेंबर 2022 या काळात घडला. या प्रकरणी अनिल शरद अहिरराव (वय 49, रा. चिखली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून बालाजी बळीराम घोडके (वय 32, रा. दौंड), संग्राम यादव (वय 45, रा. कोल्हापूर), बालाजी फायनान्सचे मालक मुजावर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीस कर्ज देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून सात कोरे धनादेश घेतले. आरोपींनी इतरांनाही कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवले आहे. -------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.30 सप्टेंबर 2022 संकलित गुन्हे वृत्त दि.30 सप्टेंबर 2022 Reviewed by ANN news network on ९/३०/२०२२ ०४:०८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.