लोणावळा : बनावट सोने आणि हिरे विकून एका कारखाना मालकाची फसवणूक करणार्या टोळीच्या प्रमुखास पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी समद हमीद मकानी वय 53 वर्षे, रा. मुंबई यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून भिमा गुलशन सोळंकी रा. बडोदा गुजरात सध्या रा. देहूरोड पुणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भा.दं.वि.कलम 406, 417, 419, 420, 504, 506, 34 अन्वये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी समद मकानी याची सॉफ्टवेअर कंपनी आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी त्याच्याशी ओळख काढून बंगळुरू एक जुने घर पाडताना सोन्याच्या विटा आणि हिरे सापडले आहेत. ते विकण्यासाठी मदत करा अशी गळ फिर्यादीला घातली. आणि त्याच्याकडून 10 लाख रुपये घेऊन त्याला बनावत सोन्याची वीट आणि हिरे देऊन त्याची फसवणूक केली. तशी तक्रार 22 सप्टेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना दिल्या होत्या. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना 27 सप्टेंबर रोजी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून गुन्हे शाखेने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक सुनिल माने, नेताजी गंधारे, सचिन रावळ, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, हनुमंत पासलकर, युवराज बनसोडे, हवालदार राजू मोमीन, नाईक बाळासाहेब खडके, शरद जाधवर, कॉन्स्टेबल धीरज जाधव, प्राण येवले, नाईक मनिषा डमरे, कॉन्स्टेबल दगडू विरकर व मच्छिंद्र पानसरे यांनी केली आहे.
बनावट सोने देऊन फसवणूक करणार्या टोळीचा प्रमुख अटकेत
Reviewed by ANN news network
on
९/२९/२०२२ ११:०९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: