चांदखेड येथील त्या मृतदेहाचे गूढ उकलले
7 जण अटकेत
पिंपरी : चांदखेड येथे दि. 9 सप्टेंबर रोजी रस्त्याच्या बाजूस एक अनोळखी मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला असून या प्रकरणी 7 जणांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
मृताचे नाव समाधान तारासिंग पवार, वय 26 वर्षे, रा. महागांव (मारखेड), ता. बार्शी टाकळी, जि. अकोला असे आहे. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नावे समीर शहाबुददीन शेख वय 37 वर्षे, सागर दयानंद पिल्ले, वय 32 वर्षे, सुरज दयानंद पिल्ले, वय 32 वर्षे, सर्व राहणार चिंचवड, रविकुमार अरविंद राठोड वय 31 वर्षे, रा. मांजरी ता. मुळशी, नितीन लक्ष्मण पवार, वय 19 वर्षे, हिंजवडी, अजित प्रभुराम ध्रुव, वय 22 वर्षे, रा.हिंजवडी मूळ रा. छत्तीसगड, हिलालाल उर्फ लाला मंका मोटे वय 30 वर्षे रा. नेवाळेवस्ती चिखली यांना अटक करण्यात आली आहे.
मृत समाधान पवार याने आणि त्याच्या साथीदारांनी आरोपींना स्वस्तात सोने देतो असे सांगून फसवणूक केल्यामुळे आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा तपास करणे अत्यंत किचकट होते. पोलिसांनी अत्यंत चिकाटीने तपास करून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात यश मिळविले आहे.
------------------
चांदखेड येथील त्या मृतदेहाचे गूढ उकलले!, 7 जण अटकेत
Reviewed by ANN news network
on
९/१५/२०२२ ०२:५३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: