Police e news

द्रुतगती मार्गावर अपघात; एक गंभीर जखमी

द्रुतगती मार्गावर अपघात; एक गंभीर जखमी लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चालक जबर जखमी झाला. तो ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. या अपघातामुळे वाहतूक काही काळ खोळंबली. द्रुतगती मार्गावर किलोमिटर 36 नजिक गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रेलर क्रमांक एनएल 01 एAएA 8987 चे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला. ट्रेलरने अज्ञात वाहनाला ठोकर दिली आणि तो रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेडस तोडून थांबला.या अपघातात जायरहुसेन गुलबुद्दीन छोटे, वय 36, रा . मध्यप्रदेश हा ट्रेलर चालक जबर जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस, आय. आर. बी. पेट्रोलिंग, अ‍ॅम्ब्युलन्स यंत्रणा तिथे दाखल झाल्या. जवळपास अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले. चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ त्याला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. ------------------------
द्रुतगती मार्गावर अपघात; एक गंभीर जखमी द्रुतगती मार्गावर अपघात; एक गंभीर जखमी Reviewed by ANN news network on ९/१५/२०२२ ०२:५२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.