Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि.24 सप्टेंबर 2022

अल्पवयीन मुलीवर बलात्कार खडकी : खडकीतील एका 15 वर्षांच्या मुलीला तिचे अर्धनग्न फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याची धमकी देऊन एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 2020 ते 2022 या कालावधीत घडला. या प्रकरणी मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी ओंकार महादू डेंगळे (वय 20) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि त्या मुलीची ओळख होती. याचा गैरफायदा घेत आरोपीने तिचे अर्धनग्न फोटो काढले होते. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्या मुलीने हा प्रकार मुलीने तिच्या कुटुंबीयांच्या कानावर घातला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. -------------------------------- प्रियकराने केले प्रेयसीवर वार हिंजवडी : महाळुंगे येथे बुधवारी रात्री एका तरुणाने घरात घुसून एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले. यात ती तरुणी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी त्या तरुणीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून गजानन अंगद चौधरी (वय 31, रा. महाळुंगेे, ता. मुळशी) याला अतक करण्यात आली आहे. फिर्यादीची मुलगी 21 वर्षांची असून तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ती घरात एकटीच असताना आरोपीने घरात शिरून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ---------------------------- डॉक्टरच्या कानशिलात लगावली पिंपरी : पिंपरी येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजता एका रुग्णाच्या नातवाने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी डॉक्टर शिवाप्पा रविंद्र देवरमनी (वय 26, रा. डी.वाय.पाटील मेडीकल हॉस्पिटल बॉईज हॉस्टेल) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दुर्गेश राजन पुराणिक (वय 28, रा.मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे आजोबा कालीदास गजानन पुराणिक (वय 96) हे उपचारासाठी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या कमरेमध्ये अस्थिभंग झाला असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावयाची होती. मात्र, आरोपीने फिर्यादीला पेशंटला कोठेही हलवायचे नाही. गरज असेल तर तुमच्या हृदयरोग विशारद डॉक्टरांनाच येथे बोलवा असे फिर्यादीला सांगून शिवीगाळ केली. आणि फिर्यादीच्या कानशिलात लगावली. -------------------- वृद्धाच्या खिशातून 2 आयफोन चोरले चिंचवड : चिंचवड भाजी मंडई येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचे 2 आयफोन अज्ञात चोरट्यांनी लांबवले. हा प्रकार 31 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडला. दि.23 सप्टेंबर रोजी संजय रमणलाल देवदास (वय 60, रा. निगडी प्राधिकरण) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलिसात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी गणपती उत्सवामुळे मंडईमध्ये गर्दी होती. फिर्यादी भाजी खरेदीसाठी फिर्यादी गेला असता गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशातून 95 हजार रुपये किंमतीचे 2 आयफोन चोरले. ------------------------------ चिखलीतील कारखान्यातून तांब्याच्या पट्ट्या लांबवल्या चिखली : चिखलीतील एका कारखान्यातून 72 हजार रुपये किमतीच्या 13 तांब्याच्या पट्ट्या चोरीस गेल्या आहेत. ही चोरी दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री झाली. याप्रकरणी राजेंद्र मुरलीधर काळे (वय 60 रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या उघड्या खिदकीतून आत प्रवेश केला. आणि, आतील 72 हजार 117 रुपये किंमतीच्या 13 तांब्याच्या पट्ट्या चोरून नेल्या आहेत. ---------------------- रावेत येथील व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक रावेत : रावेत येथील एका व्यक्तीला मॉन्जिनीज या प्रसिद्ध केक बनविणार्‍या कंपनीची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने तब्बल 12 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. हा प्रकार 8 ते 20 सप्टेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी राजेश किरणचंद संघवी (वय 53, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 9593203357 क्रमांकावरून बोलणार्‍या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला मॉन्जिनीजचे केक शॉप सुरु करायचे होते. त्यासाठी त्याने ऑनलाईन माहिती घेतली. त्यानंतर 18001216986 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीला एका ई मेल आयडीवर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर तीन बँक खात्याचे तपशील पाठवून त्यावर 12 लाख 12 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल सामान, केकचे प्रकार पाठविण्यात येणार होते. मात्र आरोपींनी फिर्यादीला कोणतेही सामान न पाठवता त्याची फसवणूक केली. ----------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.24 सप्टेंबर 2022 संकलित गुन्हे वृत्त दि.24 सप्टेंबर 2022 Reviewed by ANN news network on ९/२४/२०२२ ०२:१३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.