बनावट दारूनिर्मिती करणारी टोळी जेरबंद
पिंपरी : राज्य उत्पादन शुल्क खात्याने नाणेकरवाडी येथे छापा घालून बनावट देशी दारूची निर्मिती करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी हरीश ब्रीजेशकुमार चंद्र व राघवेंद्र यशवीर सिंह, वाहीद साजीद शेख, सुनील राममूरत बिंद यांना अटक करण्यात आली असून बनावट मद्याचा मोठा साठा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निरीक्षक स्वाती भरणे यांना नाणेकरवाडी येथे बनावट दारू निर्मिती करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कर्मचार्यांनी नाणेकरवाडीतील गोकुळ सोसायटीमध्ये छापा घातला.
तेथे असलेले आरोपी हरीश ब्रीजेशकुमार चंद्र (वय 24) व राघवेंद्र यशवीर सिंह, (वय 20) (दोघेही रा. नानेकरवाडी, चाकण, ता.खेड जि.पुणे) यांच्याकडे टँगो पंच या देशी दारूचे 180 मिलीच्या बाटल्या असलेले 7 खोके तसेच 90 मिलीच्या बाट्ल्या असलेले 3 खोके आणि मॅकडॉवेल्स नं. 1 व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 54 बाटल्या याखेरीज रिकाम्या बाटल्या पाणीमिश्रीत बनावट मद्य आढळले.या आरोपींकडे व्यवस्थित तपास केला असता त्यांनी अधिक माहिती दिली. त्यावरून मे. छाबड़ा कंट्रीलिकर या दारू दुकानासमोर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये वाहीद साजीद शेख याच्याकडील टँगो पंच 180 मिलीच्या बाटल्या असलेले 25 खोके तसेच 90 मिलीच्या बाटल्यांचे 2 खोके ताब्यात घेण्यात आले.
वाहीद शेख याने बनावट दारू सुनील राममूरत बिंद याला विकल्याची कबुली दिली. त्याला नाणेकरवाडी कमान चाकण, ता.खेड येथून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एकूण 2 लाख 10 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपीना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई निरीक्षक, सुनिल परले, डी. सी. जानराव व दुय्यम निरीक्षक, एस. टी. भरणे, डी. बी. सुपे, एन. आर. मुजाळ, ए. पी. बडदे, सहाय्यक दुय्यम निरिक्षक रवि लोखंडे, स्वनील दरेकर, डी. बी. गवारी व रसूुल काद्री, शिवाजी गळवे, राहूल जौजाळ, रावसाहेब देवतुळे, गायकवाड, अतुल बारंगुळे, सोलंके, समीर पडवळ यांनी केली आहे. पुढील तपास दुय्यम निरिक्षक स्वाती भरणे या करत आहेत.
बनावट दारूनिर्मिती करणारी टोळी जेरबंद
Reviewed by ANN news network
on
९/११/२०२२ ०३:१४:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/११/२०२२ ०३:१४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: