Police e news

शहरात रस्त्यावर फिरणारी गुरे चोरून कत्तलीसाठी नेणारी टोळी सक्रीय

शहरात रस्त्यावर फिरणारी गुरे चोरून कत्तलीसाठी नेणारी टोळी सक्रीय भोसरी : पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यावर फिरणारी जनावरे चोरून नेऊन त्यांची कत्तल करणारी टोळी शहरात सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी मध्यरात्री भोसरी येथे घडलेल्या घटनेमुळे याला पुष्टी मिळाली आहे. भोसरीगावात दिघी आळंदी रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री रस्त्यावर फिरणार्या एका गायीला चौघांनी गुंगीचे इंजेक्षन देऊन कत्तल करण्यासाठी नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई अनंता गवारी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. -------------
शहरात रस्त्यावर फिरणारी गुरे चोरून कत्तलीसाठी नेणारी टोळी सक्रीय  शहरात रस्त्यावर फिरणारी गुरे चोरून कत्तलीसाठी नेणारी टोळी सक्रीय Reviewed by ANN news network on ९/१३/२०२२ १०:४६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.