Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि. १३ सप्टेंबर २०२२

मुलाने केली आईवडिलांना मारहाण दिघी : समर्थ नगर, दिघी येथे एकाने घरगुती भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आपल्या आईवडील व भावंडाना बेदम मारहाण केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी प्रमोद शिवाजी कोळेकर (वय 32, रा. समर्थनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद कोळेकर (वय32), सूरज पाटोळे (वय 30, रा. मुंबई) आणि सूरजचे चार मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, त्याची सावत्र आई, सावत्र भाऊ यांचे आरोपी प्रसाद याच्यासोबत भांडण झाले होते. हे भांडण मिटविण्यासाठी परिसरात रहाणारे मनोज गायकवाड यांना फिर्यादींने बोलावून आणले. वाद मिटवत असताना आरोपी प्रसाद याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून कुटुंबियांना आणि मनोज गायकवाड यांनाही मारहाण केली. यावेळी आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले आणि गहाळ झाले. फिर्यादीचे वडील मध्ये आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. ---------------------- बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक दापोडी उपनिबंधक कार्यालयातील शिपायाचा प्रताप दापोडी : दापोडी येथील उपनिबंधक कार्यालयातील शिपायाने एका व्यक्तीला कंत्राटी तत्वावर ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र व कागदपत्रे देऊन त्याची फसवणूक केली. संबंधित व्यक्ती कामावर रुजू होण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत दापोडीतील उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय येथे घडला. संतोष तुकाराम शिंगाडे (वय 41, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 12) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिपाई शशांक बळवंत हाटे (वय 41, रा. रास्ता पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी दापोडीतील उपनिबंधक कार्यालयात मुख्यलिपिक पदावर काम करतात. त्यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणार्या आरोपीने नितीन रायकर यांना कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक पदावर नेमणूक झाल्याचे पत्र दिले.तसेच अन्य कागदपत्रेही दिली. ती घेऊन रायकर उपनिबंधक कार्यालयात आले असता हा याप्रकारे उघडकीस आला. -------------------
संकलित गुन्हे वृत्त दि. १३ सप्टेंबर २०२२ संकलित गुन्हे वृत्त दि. १३ सप्टेंबर २०२२ Reviewed by ANN news network on ९/१३/२०२२ १०:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.