Police e news

किरकोळ गुन्हे वृत्त दि.०४/०९/२०२२

पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार हिंजवडी : हिंजवडी येथे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पूर्ववैमनस्यातून दोघांनी एका विद्यार्थ्यावर वार केले. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आकाश अरूण खानेकर (वय 18 रा.दत्तवाडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शिवराज मारूती शेडगे (वय 20 रा.मुळशी) व चैतन्य ऊर्फ संदिप परशुराम माणके (वय 20 रा.मुळशी) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात जुना वाद होता. त्याच्या रागातून फिर्यादी व त्याचा मित्र सोबत जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी अडवली. फिर्यादीला शिवीगाळ केली. शिवराज याने हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर व हातावर वार केले. तेव्हढ्यात फिर्यादीच्या ओळखीचे योगेश जाधव तेथे आले त्यामुळे आरोपी पसार झाले. ------------------ तडीपार गुंडाने केली पोलिसाला धक्काबुक्की चिंचवड : दळवीनगर झोपडपट्टी येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता तडीपार गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याला त्या गुंडाने धक्काबुक्की केली. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अमोल गुलाब माने यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आकाश ऊर्फ भावड्या भारत कुदळे (वय 27 रा. दळवीनगर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी तडीपार असून शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी त्याला अटक करण्यास गेला असता आरोपीने फिर्यादीला धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ----------------- खोली भाड्याने घेण्याच्या बहाण्याने फसवणूक निगडी : खोली भाड्याने घेण्याच्या बहाण्याने एका ठकसेनाने निगडी प्राधिकरणातील एका व्यक्तीला 1 लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातला.हा प्रकार 7 जून ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला. या प्रकरणी विवेकानंद कल्याणी मुदकन्ना (वय 20 रा. निगडी प्राधिकरण) याने तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी प्राधिकरण येथील फिर्यादीचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. यावेळी आरोपीने आपण सेनाधिकारी असल्याचे सांगून वेगवगेळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून फ्लॅटचे डिपॉझिट देण्याचा बहाणा केला. यासाठी त्याने फिर्यादीचे आणि त्याच्या वडिलांचे बँक डिटेल्स मागवून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांच्या खात्यावरील 1 लाख 90 हजार रुपये परस्पर काढून घेतले. ---------------- शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक चिखली : शेअरबाजारात गुंतविण्यासाठी गुंतवणूकदारांकडून घेतलेले 31 लाख रुपये शेअरबाजारात न गुंतवता अन्यत्र गुंतवून चौघांनी दोघांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 2 जून ते 3 ऑगस्ट या काळात चिखली येथे घडला. याप्रकरणी अरुणोदय हरिदास चोरगे (वय 29 रा.चिखली) यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली. त्यावरून नितीन विश्वनाथ करळे, तुषार ज्ञानेश्‍वर शिवेकर व महिला आरोपी, प्रवीण राठोड (जाई स्टॉक ट्रेडिंग, कस्पटेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी सुभाष निवृत्ती कोल्हे यांना आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच दोघांना गुंतवणूक करण्यास सांगून त्यांनी गुंतवलेली रक्कम केवळ ट्रेडींगमध्ये गुंतवणार असल्याचे सांगितले. बँकेपेक्षा जास्त परतावा देऊ असे आमिष दाखवले.काही काळ व्याज व मुद्दलीचा काही भाग फिर्यादी व त्यांच्या साथीदाराला ही दिला, मात्र त्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. तसेच करारनाम्यात लिहून दिले असतानाही गुंतवणूक शेअरबाजारात न करता ही रक्कम अन्यत्र वापरून फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍याला 31 लाख 1 हजार रुपयांना फसविले. --------------- स्वस्तात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक पिंपरी : कमी किंमतीत सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका महिलेला 25 लाख रुपयांना फसविले. हा प्रकार 3 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत पिंपळे निलख आणि पिंपळे सौदागर येथे घडला. या प्रकरणी त्या महिलेने सांगवी पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून संतोष कोंडीबा शिंदे (वय 43, रा. रहाटणी), दिनेश दत्तात्रय पाटील (वय 57, रा. पिंपळे सौदागर), संदीप परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला कमी किंमतीत नवीन सदनिका मिळवून देण्यासाठी मदत करतो असे सांगून त्यांना आरोपींनी एका गृहसंकुलात नेले. सदनिका कमी किमतीत खरेदी केल्याचे भासविले. त्यानंतर फिर्यादीच्या नावावर सदनिकेसाठी कर्ज मिळत नसल्याचे संतोष शिंदे याने फिर्यादीला सांगितले. त्यानंतर स्वतःच्या नावावर कर्ज काढून ते पैसे बांधकाम व्यावसायिकाला दिले आहेत, असे भासवून फिर्यादीला 16 लाख 66 हजार रुपये बँक आपल्या खात्यावर भरण्यास सांगितले. तसेच रोख 8 लाख 40 हजार रुपये घेतले. अशी एकूण 25 लाख 6 हजार रुपयांची फसवणूक केली. ---------------- कंपनीच्या अधिकार्‍याने चोरले लॅपटॉप निगडी : शहरातील प्रीमियम ट्रान्समिशन या कंपनीतील अधिकार्‍याने सुरक्षा रक्षकाबरोर संगनमत करून 14 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत कंपनीतील पाच लॅपटॉप चोरले. त्यांची एकूण किंमत सव्वा दोन लाख असल्याचे पोलिसांकडून समजते. जयंत मनोहर हर्षे (वय 56, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारीनिगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी इंद्रजित वाझे, सुरक्षा रक्षक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -------------------- नेहरूनगर येथे दुकानाला आग पिंपरी : संतोषीमाता चौक, नेहरूनगर, पिंपरी येथील एका दुकानाला शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने याची खबर मिळताच तेथे जाऊन आग विझविली. आगीत दुकानातील फर्निचर जळाले आहे. संतोषीमाता चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे एक खाद्यपदार्थांचे दुकान असून या दुकानात पहाटे चारच्या सुमारास आग लागली. एका नाग्रिकाच्या लक्षात ही बाब येताच त्याने अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जाऊन अर्धा तासात ही आग विझविली. ----------------------- क्षुल्लक कारणावरून मारहाण पिंपरी : संत तुकारामनगर येथे कचर्‍याचा डबा दारात ठेवण्याच्या कारणावरून गुरुवारी एका व्यक्तीस शेजार्‍याने मारहाण केली. या प्रकरणी उद्धव श्रीकृष्ण सोमाणी (वय 38 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याने फिर्याद दिली असून अमन अयाज शेख (वय 18) व 65 वर्षीय महिलेवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींचे वडील व महिला आरोपी यांच्यात सकाळी कचर्‍याचा डबा दारात ठेवण्यावरून भांडण झाले. या रागातून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी अमन फिर्यादीच्या घरात घुसला व त्याने फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी फायटर मारून जखमी केले. ------------------------
किरकोळ गुन्हे वृत्त दि.०४/०९/२०२२ किरकोळ गुन्हे वृत्त दि.०४/०९/२०२२ Reviewed by ANN news network on ९/०४/२०२२ ०७:२७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.