वडगाव मावळ पोलिसठाण्याच्या आवारातील 98 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध
वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि अनेक वर्षे पोलिसठाण्याच्या आवारात धूळ खात पडलेल्या 98 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध वडगाव मावळ पोलीस स्टेशन व गंगामाता वाहन शोध संस्था यांनी लावला आहे. याची यादी पोलीसठाण्यात लावण्यात आली असून वाहन मालकांनी 15 दिवसात ओळख पटवून आपली वाहने घेऊन जावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस अनेकदा वाहने जप्त करतात. ही वाहने अनेक वर्षे पोलीसठाण्याच्या आवारात धूळ खात पडून असतात.अशाच प्रकारे वडगाव मावळ पोलीसठाण्याच्या आवारात गेली अनेकवर्षे ही वाहने पडून होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ती त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश वडगाव मावळ पोलीसठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिले.
वडगाव मावळ पोलिसांनी वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी परंदवाडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावला. पोलिसांनी वाहनमालकांना पत्र पाठविले असून 8 दिवसात वाहन घेऊन जाण्यास कळविले आहे. कोणीही वाहन घेऊन जाण्यास न आल्यास त्यांचा न्यायालयाच्या आदेशाने लिलाव करण्यात येणार आहे.
वडगाव मावळ पोलिसठाण्याच्या आवारातील 98 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध
Reviewed by ANN news network
on
९/०४/२०२२ ०७:२२:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०४/२०२२ ०७:२२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: