Police e news

कुरवंडे येथील विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला

कुरवंडे येथील विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला लोणावळा : लोणावळा कुरवंडे रस्त्यावर मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास शिकवणीहून घरी जाणार्‍या एका विद्यार्थ्यांवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. या विद्यार्थ्याच्या डोक्यात कठीणवस्तूने प्रहार करण्यात आला आहे.तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. मयुर तानाजी फाटक (वय 15, रा. कुरवंडे ता. मावळ ) असे या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याचे वडील तानाजी फाटक यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यापुर्वी फाटक यांच्या मुलांना विनाकारण काही युवक त्रास देत होते. याबाबत त्यांनी त्या मुलांना भेटून समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फाटक यांना मारण्याची धमकी दिली होती. तसेच तुमची मुले या रस्त्याला भेटली तर आम्ही त्यांना दाखवतो असे धमकावले होते. त्यानंतर मंगळवारी मयूर हा सायंकाळी शिकवणीहून घरी येत असताना अंधारात ही घटना घडली आहे. त्याला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
कुरवंडे येथील विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला कुरवंडे येथील विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला Reviewed by ANN news network on ९/१६/२०२२ ०२:१५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.