Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि. 14 सप्टेंबर 2022

लोहमार्गानजिक मृतदेह आढळला लोणावळा : देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन सोमवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. दरम्यान एका ४० वर्षीय पुरुषाचा अनोळखी मृतदेह आढळला. मृताचे वय अंदाजे ४० वर्षे असून उजव्या हातावर जय माँ शेरावाली, डाव्या हातावर ॐ गोंदलेले आहे. उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. अंगाने सडपातळ, उभा चेहरा, नाक सरळ व चेहèयावर दाढी,मिशी आहे. अंगात निळ्या रंगाचा पूर्णबाह्यांचा शर्ट, निळी फुल पॅन्ट आणि चॉकलेटी रंगाची अंडरवेअर आहे. ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची अथवा नातेवाईक किंवा या विषयी कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी प्रशांत संपत जाधव लोहमार्ग पोलीस, मोबाईल क्र.८८८८६१८१०० यावर संपर्क साधावा असे आवाहन लोणावळा लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. -- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाèयास अटक थेरगाव : थेरगाव येथील एका रिक्षाचालकाने शेजारी राहणाèया अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिस दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती मुलगी गर्भवती झाली. याप्रकरणी त्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. ही घटना १ डिसेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत थेरगाव येथे घडली आहे. विकास सतीश गायकवाड (वय ३२ रा.थेरगाव) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीची मुलगी १५ वर्षांची असून तिला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. -- इंटरनेट व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी हिंजवडी : एअरटेल कंपनीची इंटरनेट सेवा पुरवणाèया केबलचालकाला हातपाय तोडण्याची धमकी देत त्याच्याकडून दरमहा हप्त्याची मागणी करणाèया एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मुळशी आय.टी.पार्क डिसेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ या कलावधीत घडला. या प्रकरणी रोहीत संजय शिवले (वय ३६ रा.सोमवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश ओझरकर (रा.माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा एअरटेल कंपनीची इंटरनेट सेवा केबलद्वारे पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या केबलदुरुस्तीचे काम कंपनीचा सप्लायर करण शिंदे करत असताना आरोपीने तेथे येऊन शिंदे व इतर कामगारांना काम करत महिन्याला २० हजार रुपये हप्ता दे, नाही तर तुझी केबल तर तोडेनच. तुझे हातपाय पण तोडेन, पुन्हा आलास तर मुळशी पॅटर्न करेन असे म्हणत खंडणीची मागणी केली. -- एक लाखाचा गांजा जप्त पिंपरी : रावेत परिसरात मंगळवारी दुपारी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका घरावर छापा घालून १ लाख ९५० रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक केली. मोहम्मद राजू नसरुद्दीन अली (वय २७, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने हा गांजा एका महिलेकडून आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ओटास्कीम, निगडी येथे राहणाèया त्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. --
संकलित गुन्हे वृत्त दि. 14 सप्टेंबर 2022 संकलित गुन्हे वृत्त दि. 14 सप्टेंबर 2022 Reviewed by ANN news network on ९/१४/२०२२ १०:२८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.