दवाबाजार येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून
चिंचवड : दवाबाजार, आनंद नगर, चिंचवड येथे शनिवारी ात्री साडेदहाच्या सुमारास दोघांनी एका तरुणाचा दगडानी ठेचून खून केला.
सागर कांबळे (वय 22, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.हा खून झाल्याची माहिती पोलिसांना रविवारी सकाळी मिळाली.
पोलिसांनी कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघेजण मृत तरुणासोबत दिसत आहेत.
मृताला दारुचे व्यसन होते. मागील आठवड्यात त्याने एका मुलीची छेड काढली होती. त्यावरून त्याला मारहाण झाली होती.शनिवारी रात्री मृत सागर आणि अन्य दोघे असे तिघेजण कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. तिथे त्यांच्यात वाद झाला. दोघांनी सागर याला आधी सोसायटीच्या पार्किंगमध्ये मारहाण केली. त्यानंतर त्याला सोसायटी समोरील भिंतीजवळ आणले आणि दगडाने त्याचे डोके ठेचले. यात सागरचा मृत्यू झाला.
चिंचवड : दवाबाजार येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून
Reviewed by ANN news network
on
९/२५/२०२२ ०५:२०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: