लोणावळा : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर शनिवारी दुपारी पर्यटनासाठी आलेल्या एका मुलाचा पाय घसरून तो दरीत पडल्याने जखमी झाला.शिवदुर्ग मित्र, लोणावळा या बचाव पथकाने त्या मुलाचे प्राण वाचवले.
शिवदुर्ग पथकाने घटना कळताच तेथे जाऊन त्या युवकाचे प्राण वाचविले. त्याला संध्याकाळी 7 वा च्या सुमारास किल्ल्याखाली आणण्यात आले. त्यानंतर त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा पाय मोडल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
या मोहिमेत प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, राजेंद्र कडू, आनंद गावडे , महेश मसने , योगेश दळवी,अमोल सुतार ,रोहित वर्तक, समीर जोशी, रतन सिंग, हर्षल चौधरी, सिद्धेश निसाळ, शालिनी शर्मा, दक्ष काटकर, महेश गायकवाड, रितेश कुडतरकर, निकेत म्हाळसकर, मच्छिंद्र वाघमारे , रोहित नगिने , सुनिल गायकवाड यांनी भाग घेतला.
विसापूर किल्ल्यावर पर्यटक दरीत पडून जखमी
Reviewed by ANN news network
on
९/२५/२०२२ ०३:४७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: