पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
मोशी : पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मोशी येथील एका तरुणाने 24 ऑगस्ट रोजी गळपास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या माहेरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अंकुश डोंगरे (वय 33, रा. मोशी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताची पत्नी (वय 27, रा. दिघी) संदीप बाळू धेंडे (वय 34), सासू (वय 55), शंकर बाळू धेंडे (वय 64), महिला आरोपी (वय 31 सर्व राहणार पिंपरी) यांच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नानंतर मृताच्या पत्नीला माहेरच्यांनी तिला नांदावयास पाठविले नाही मृत व्यक्ती आणि त्याच्या घरच्यांची फसवणूक केली मृतावर खुनाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीला घतस्फोट दे आणि 12 लाख नुकसान भरपाई दे अन्यथा तुला मारून टाकेन अशी धमकी आरोपी संदीप याने मृताला दिली होती. या या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
---------------------
पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:३१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: