गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी, हिंजवडीतील वाहतुकीत बदल
पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी व हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. दि.4, 6, 8 व 9 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकी करिता सायं.4 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चौकातून शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने पिंपरी पुलावरून उजवीकडे भाटनगरमार्गे इच्छितस्थळी जातील. मोरवाडीमार्गे एम्पायर इस्टेट येथील सेंट मदर टेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच काळेवाडी पुलावरून येणार्या वाहनांना डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. ही वाहने काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गाने जातील. पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने पिंपरी चौकाकडून सेवारस्त्याने क्रोमा शोरूमसमोरुन पुढे जातील. हा बदल 4, 6, 8 व 9 सप्टेंबरला सायंकाळी चार ते रात्री बारा या वेळेसाठी असेल.
तसेच हिंजवडी परिसरातीलाही वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद असेल. येथील वाहतूक लक्ष्मी चौकाकडून जातील. जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून मेझा 9 व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक टाटा टी जंक्शन चौकाकडे जाऊन लक्ष्मी चौकमार्गे जातील. मेझा 9 चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास मनाई असून ही वाहने लक्ष्मी चौक मार्गे पुढे जातील. तसेच शिवाजी चौकाकडून वाकडनाका, हिंजवडी गावठाण कडे जाण्यास बंदी असेल. ही वाहने विप्रो सर्कल फेज एक, जॉमेट्रिक, टाटा टी जंक्शन चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौक हिंजवडीकडे वाहने जाण्यास बंदी असेल. ही वाहने विनोदे वस्ती कॉर्नर, लक्ष्मी चौक मार्गे जातील. शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाणारी वाहने इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौकने पुढे विनोदे वस्ती कॉर्नरमार्गे जातील. हा बदल 9 सप्टेंबरला सायंकाळी चार ते रात्री बारा पर्यंत असेल.
---------------------
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी, हिंजवडीतील वाहतुकीत बदल
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:३५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: