Police e news

तळेगावात विवाहितेला मारहाण

तळेगावात विवाहितेला मारहाण तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलनीमध्ये दिनांक 31 ऑगस्ट रोजी एका विवाहितेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न तिच्या पतीसह सासू सासर्‍यांनी केला. या प्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून त्या महिलेचा पती अविनाश किसन गायकवाड (वय 31), सासू (वय 55), सासरे किसन खंडू गायकवाड (वय 60) यांच्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नात कमी हुंडा दिला या आणि इतर कारणांवरून आरोपी जानेवारी महिन्यापासून फिर्यादीला त्रास देत होते. 30 ऑगस्ट रोजी हरितालिकेच्या उपवासाने अशक्तपणा आला म्हणून फिर्यादीने सासूला स्वयंपाक करण्यास सांगितले. त्यावेळी सासूने फिर्यादीला शिवीगाळ करत स्वयंपाक करण्यास नकार दिला. सासर्‍याने काठीने मारहाण केली. पतीनेही मारहाण करत फिर्यादीला खाली पडले व गळ्यावर पाय ठेवून तुला ठार मारून टाकतो असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. -----------------------
तळेगावात विवाहितेला मारहाण तळेगावात विवाहितेला मारहाण Reviewed by ANN news network on ९/०३/२०२२ ०३:३०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.