पवना धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; पाच बचावले
पवनानगर : मुंबईहून पवना धरण परिसरात फांगणे येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. पाच जणांना वाचविण्यात नागरिकांना यश आले.
आर्या दीपक जैन (वय-13), समीर कुलदीप सक्सेना (वय 43) अशी मृतांची नावे आहेत.
धरण परिसरात एका कुटुंबातील चार सदस्य आणि त्यांच्या मुलांचे शाळेतील तीन मित्र व एक कामगार असे आठजण फिरण्यासाठी आले होते. यापैकी कामगार वगळता सर्वजण पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सात जण बुडू लागले. हे लक्षात येताच कामगाराने आरडाओरडा केला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांशी संपर्क साधला. तसेच बुडणार्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलीसही अवघ्या काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी रफिक शेख यांनी पाण्यात उडी मारून बुडत असलेल्या पाच जणांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. दोन जण लांब असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
-------------------------
पवना धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; पाच बचावले
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:३७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: