Police e news

नॉन बँकिंग कंपनीला गंडा घालणार्‍यावर गुन्हा दाखल

नॉन बँकिंग कंपनीला गंडा घालणार्‍यावर गुन्हा दाखल खडकी : नॉन बँकिंग कंपनीत विक्री व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सात अर्ज प्रकरणे करून कंपनीला तब्बल 1 कोटी 82 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार येथे नुकताच घडला. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनातर्फे सुमित भाऊ कांबळे (वय 36, रा. येरवडा) याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून महेश धोंडीराम टोंगळे (वय 31, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि त्याच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2020 ते 19 मे 2022 या कालावधीत घडला. आरोपी महेश टोंगळे हा संबंधित नॉन बँकिंग कंपनीत विक्री व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे 5 कर्जदारांच्या नावे 7 कर्ज प्रकरणे सादर करून कंपनीकडून 1 कोटी 82 लाख 7 हजार 888 रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. तपासणीमध्ये ही कर्जप्रकरणे बनावट असल्याचे दिसून आले. आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने त्याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.
नॉन बँकिंग कंपनीला गंडा घालणार्‍यावर गुन्हा दाखल नॉन बँकिंग कंपनीला गंडा घालणार्‍यावर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ९/०३/२०२२ ०३:३९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.