पिंपरी : अपघाताचा बनाव करून मुंबई बंगळुरू महामार्गावर प्रवास करणार्यांना लुटणार्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
11 ऑगस्ट रोजी मुंबई बंगळुरू दुचाकीचा धक्का लागल्याने एकजण खाली पडला. त्याला लागले असे म्हणत तेथे असलेल्या दोघांनी दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले होते.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रकाश रस्तोगी यांनी तक्रार दिली होती.
अशाप्रकारे बनाव करून या मार्गावरून प्रवास करणार्यांना लुटण्याचा धंदा या टोळीने उघडला होता.अशाप्रकारची टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टेहळणी करून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांना अटक केली असून साहिल संजय साठे (वय 21 रा. मुळशी) व हर्षल सुनिल गोळे (वय 20 मुळशी) अशी त्यांची नावे आहेत दोन महिन्यापूर्वी त्यांनी एका टेम्पोचालकालाही लुटल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून दीड तोळ्याची सोन्याची साखळी जप्त केली आहे.
ही कारवाई तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहायक पोलीस फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, पोलीस हवालदार कैलास केंगले, योगेश शिंदे, बापू धुमाळ, विक्रम कुदळ, पोलीस नाईक रितेश कोळी, अरूण नरळे,चंद्रकांत गडदे,श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार व पोलीस शिपाई पंडित यांनी केली.
पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे करत आहेत.
महामार्गावर प्रवाशांना लुटणारे जेरबंद
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२२ ०४:४६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: