पिंपरी : मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द येथील सरपंच आणि ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाèयांनी शुक्रवारी लाच स्वीकारताना ङ्करंगेहाथङ्क पकडले. अनिल बाळू येवले असे सरपंचाचे नाव असून अनिल बाळासाहेब थोरात असे ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काम्शेत पोलिसठाण्यात शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. एका ग्रामस्थाने त्याच्या चुलत आजी, आजोबांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी दि. २६ सप्टेंबर रोजी कुसगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. ते प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंचाने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार रुपये दिल्यास प्रमाणपत्र देण्याचे कबूल केले. ग्रामसेवकाने सरपंचाला लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. हा प्रकार घडल्यानंतर त्या ग्रामस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधला. या खात्याच्या अधिकाèयांनी गुरुवारी तक्रार बरोबर असल्याची पडताळणी केली. शुक्रवारी सापळा लावला. सरपंचाने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर अधिकाèयांनी सरपंच आणि ग्रामसेवकाला ताब्यात घेतले. त्यांना कामशेत पोलिसठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक करत आहेत.
कुसगाव खुर्द येथील सरपंच आणि ग्रामसेवकाला लाच घेताना अटक
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२२ ०९:३४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: