घरफोडी करून लाखाचा ऐवज लांबवला
हिंजवडी : जांभे नेरे रस्त्यावर असलेले एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 12 हजार रुपयांचे दागिने लांबवले. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. (दि. 30) दुपारी उघडकीस आली.
या प्रकरणी उमाशंकर चुडाप्पा राठोड (वय 52, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) याने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम के गायकवाड फार्म हाऊस, जांभे नेरे रस्ता येथे फिर्यादीचेे घर आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात ते शुक्रवारी दुपारी दोन पर्यंतच्या कालावधीत घर बंद होते. अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करत 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
------------------------
चिटफंड कंपनी चालकाने केली फसवणूक
भोसरी : एमआयडीसी भोसरी येथील एका वृद्धाला चिटफंड कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष एकाने त्याच्याकडून 80 लाख 70 हजार 647 रुपयांच्या ठेवी घेऊन त्याची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडला.
याप्रकरणी कडवील मॅथ्यू बाबू (वय 75, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून जेकब जॉर्ज (वय 58, रा. बोपोडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादी आणि इतर सभासदांना त्याच्या चिटफंड कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपीकडे काही व्यक्तींनी 80 लाख 70 हजार 647 रुपये ठेव ठेवली. या ठेवी आरोपीने परत न देता पैशांचा अपहार करून फसवणूक केली.
-------------------------------
चिंचवड येथे तरुणाला लुटले
चिंचवड : रामनगर, चिंचवड येथे शनिवारी सकाळी एकाने चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला लुटले.
याप्रकरणी अजितकुमार रवींद्र साह (वय 28, रा. रामनगर, चिंचवड) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अविनाश कुसाळकर (वय 34, रा. रामनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किराणा दुकानात वस्तू खरेदीसाठी गेला असता आरोपीने फिर्यादींला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील 25 हजार 500 रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्यावेळी जमलेले लोक आरोपीला विरोध करीत होते. आरोपीने नागरिकांना चाकू दाखवून मध्ये आलात तर ठार मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली.
---------------------------------
भोसरीतील नागरिकाची ऑनलाईन फसवणूक
भोसरी : भोसरी येथील एका नागरिकाला बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने त्याची ऑनलाईन फसवणूक केली.
याप्रकरणी दिगंबर भिमराव पराये (वय 55 रा.भोसरी) याने भोसरी पोलिसठाण्यात तक्रार दिली. त्यावरून 7027326569 या क्रमांकावरून बोलणार्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादीला कॉल केला. त्याने आपण स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे त्याने सांगितले.फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले आहे असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडले. आणि, फिर्यादीच्या क्रेडिट कार्ड मधून 34 हजार 680 रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली.
------------------------------
विरंगुळा केंद्रातून दुचाकीची चोरी
चिंचवड : संभाजीनगर चिंचवड येथील साई विरंगुळा केंद्रातून बुधवारी सायंकाळी दुचाकी चोरीला गेली.
या प्रकरणी सुरेश पांडुरंग कस्तुरे (वय 62, रा. साने चौक, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजता संभाजीनगर येथील साई विरंगुळा केंद्रात गेला होता. त्याने त्याची दुचाकी विरंगुळा केंद्राच्या बाहेर उभी केली. रात्री पावणे नऊ वाजता दुचाकी चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
----------------------------------
मोशी येथे अपघातात महिला जखमी
मोशी : हवालदार वस्ती चौक, मोशी येथे मंगळवारी सायंकाळी दुचाकीस्वार महिलेला पिकअपने धडक दिली. या अपघातात ती महिला गंभीर जखमी झाली.
याप्रकरणी राहुल सुदाम आल्हाट (वय 36, रा. मोशी) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची वहिनी मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरून जात होती. ती हवालदार वस्ती येथे आली असता दुचाकीला पिकअपने पाठीमागून धडक दिली. पिकअप चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला.
--------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: