Police e news

तडीपार सराईत गुन्हेगार अटकेत



मोशी : गोळ्या घालण्याची भाषा करत परिसरात मीच इथला भाई आहे धमकी देत दहशत पसरवणा-या तडीपार सराईताला २४ तासाच्या पोलिसांनी गजाआड केले. हा प्रकार मोशी येथील नागेश्वर मंदिरा जवळ घडला. चंदन सुरेंद्र सिंग (वय ३५ रा.थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय तुकाराम गंभिरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी याला २३ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.  तो तडीपार असताना मोशी परिसरात एक देशी बनावटीची लोखंडी पिस्टल व २ जिवंत काडतुसे घेऊन आला. शस्त्रासह परिसरात फिरत मीच पिंपरी-चिंचवडचा भाई आहे, मला कोणी डिवचले तर गोळ्या घालून ठार मारेन अशी धमकी दिली. 

तडीपार सराईत गुन्हेगार अटकेत तडीपार सराईत गुन्हेगार अटकेत Reviewed by ANN news network on १०/०६/२०२२ ०८:२९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.