जावयाने केली सासूला मारहाण
आळंदी : बायकोला सासरी नेण्यासाठी आलेल्या जावयाने सासूला मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार देवाच्या आळंदीत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला असून याबाबत ७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित सासूने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावई आणि त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावई फिर्यादी यांच्या मुलीला सासरी नेण्यासाठी आळंदी येथील घरी आला. मुलीची तब्येत ठीक नसल्याने तिला दुसèया दिवशी घेऊन जाण्याची विनंती फिर्यादींनी केली. त्यावरून चिडलेल्या जावयाने आणि त्याच्या आई वडिलांनी फिर्यादीस आणि त्यांच्या मुलीस शिवीगाळ केली. जावयाने फिर्यादीस मारहाण करून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
--
डॉक्टरकडे खंडणी मागणा-यांवर गुन्हा दाखल
भोसरी : महिला दर महिन्याला सात हजार रुपये द्यावे लागतील. तरच तू दवाखाना चालवू शकतो, अशी धमकी देत तिघांनी एका डॉक्टरकडे खंडणी मागितली. तसेच मेडिकलमधून पैसे न देता औषधे नेली. ही घटना बुधवारी (दि. ५) सायंकाळी आनंदनगर चौक, भोसरी येथे घडली.
पुरुषोत्तम कारभारी राणे (वय ४२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन उर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय २५), गोविंदा कोळी (वय २४), सचिन सारसे उर्फ काळा सच्या (वय २३, सर्व रा.भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीचे आनंदनगर चौकात पुरुषोत्तम क्लिनिक आहे. तो बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता क्लिनिक मध्ये असताना आरोपी क्लिनिकमध्ये आले. दर महिन्याला सात हजार रुपये हप्ता म्हणून द्यावे लागतील.तरच तू दवाखाना चालवू शकतो. नाहीतर तुला दवाखाना चालवू देणार नाही. इलाख्यात फिरू देणार नाही. दर महिन्याला गोविंदा कोळी आणि काळा सच्या येऊन तुझ्याकडून सात हजार रुपये घेऊन जातील, अशी आरोपींनी फिर्यादींला धमकी दिली.
क्लिनिकच्या बाहेर असलेल्या मेडिकल मधून आरोपींनी औषधे घेतली, त्याचे पैसे न देता मेडिकल मालकाला शिवीगाळ करून आरोपी निघून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
--
शहरात मोबाईल व गंठण चोरीचे गुन्हे
चिखली : पायी चालत जाणाèया एका इसमाचा मोबाईल तर महिलेचे गंठण चोरून नेले आहे. या दोन्ही चोरी प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत प्रविण सुभाष लांजेवार (वय ४२, रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना अज्ञात दुचाकी चालक आला व त्याने फिर्यादीच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला आहे. हा प्रकार चिखली प्राधिकरण येथे बुधवारी (दि.५) रात्री पावणेदहा वाजता घडला.
चिखली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. दुसèया घटनेत महिलेने फिर्याद दिली असून, त्या त्यांच्या मुलीसोबत पायी घरी जात असताना अज्ञात दुचाकीस्वार पाठीमागून आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे ५० हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: