पुणे : मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी लाच घेताना पकडले. राजाराम दामू रणपिसे (वय 55) असे या ग्रामसेवकांचे नाव आहे.
एका व्यक्तीच्या वडिलांनी खरेदी केलेल्या सदनिकेची नोंद करण्यासाठी व घरपट्टी जमा करण्यासाठी या ग्रामसेवकाने 5 हजारांची लाच मागितली होती. त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि पैसे घेताना या ग्रामसेवकाला पकडले.
मेदनकरवाडीच्या ग्रामसेवकाला लाच घेताना अटक
Reviewed by ANN news network
on
१०/१४/२०२२ ०९:३६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: