Police e news

रत्नागिरीतील डॉक्टरची फ़सवणूक कस्पटेवस्तीतील भामटा अटकेत

 

रत्नागिरी : रत्नागिरीतील डॉक्टरला वैद्यकीय प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखऊन त्याच्याकडून 15 लाख 10 हजार रुपये  उकळणा-या एका भामट्याला रत्नागिरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महेश विठ्ठल आदाटे (वय 42, राहणार कस्पटेवस्ती , वाकड, जि्ल्हा पुणे)  असे या ठकसेनाचे नाव आहे. त्याच्याविरोधात डॉक्टर अमोल वासुदेव झोपे (वय 39, राहणार पर्णिका एम्पायर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

फ़सवणुकीचा प्रकार जून 2019 ते 10 मे 2022 या कालावधीत घडला आहे. डॉक्टर अमोल झोपे यांना ‘डिप्लोमा इन डर्मॆटॊलॉजी अ‍ॅन्ड व्हिनरॊलॉजी’  या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वरील कालावधीत आपल्या बँक खात्यावर आरटीजीएस, आयएमपीएस व गुगल पेद्वारे 12 लाख 60 हजार रुपये जमा करुन घेतली. तसेच आपल्या वडिलांच्या खात्यावर 2 लाख 50 हजार असे एकूण 15 लाख 10 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश मिळवून न देता डॉ. झोपे यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात 10 मे 2022 रोजी तक्रार दिली होती. 

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांनी तपास करुन आरोपीला अटक केली.

रत्नागिरीतील डॉक्टरची फ़सवणूक कस्पटेवस्तीतील भामटा अटकेत रत्नागिरीतील डॉक्टरची फ़सवणूक कस्पटेवस्तीतील भामटा अटकेत Reviewed by ANN news network on ११/३०/२०२२ ०९:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.