Police e news

देहूरोड : गोहत्या सुरू असलेल्या बेकायदा कत्तलखान्यावर धाड! कथित पत्रकारासह तिघे पोलिसांच्या ताब्यात!! (VIDEO)

 




देहूरोड :  साईनगर,  थॉमस कॉलनी, देहूरोड येथे रविवारी सकाळी गोरक्षक प्रतिक भेगडे,  मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी तसेच देहूरोड पोलिस यांच्या पथकाने एका बेकायदा सुरू असलेल्या कत्तलखान्यावर धाड टाकली. यावेळी तेथे एक कापण्यात आली होती तिची शिंगे, पाय तसेच घड पथकाला आढळून आले. यावेळी तेथे कत्तलखान्यात आत एक  कापण्यासाठी आणण्यात आलेली एक गाय आणि बाहेरील बाजूस बांधून ठेण्यात आलेली एक गाय पथकाला आढळून आली. 

या प्रकरणी पोलिसांनी तेथे गोहत्या करीत असलेल्या चौघांना पोलिसांनी  अटक केली आहे. त्यामध्ये स्वत:ला पत्रकार म्हणविणा-या एकासह व अन्य तिघांचा समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. 

साईनगर,  थॉमस कॉलनी, देहूरोड येथे कथित पत्रकार अनिस शेख याच्या घराच्या पार्किंग शेडमध्ये गोहत्या सुरू असल्याची माहिती पोलीस, मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, गोरक्षक प्रतिक भेगडे, शरद कोतकर, अण्णा आरडे  आदींना मिळाली. त्यानंतर रविवार दिनांक २३ रोजी तेथे छापा घातला असता तेथे नुकतीच एका गायीची हत्या करण्यात आली होती. तर तेथे बांधून ठेवण्यात आलेल्या दुस-या गायींची कत्तल करण्याची तयारी सुरू होती. 

देहूरोड पोलिसठाण्याच्या निरिक्षक वर्षाराणी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार  त्यावेळी तेथे गोहत्या करण्यात सहभागी असलेल्या कथित पत्रकार अनिस शेख, नदीम शेख, शाहरूख कुरेशी आणि अंकुश मारुती आमले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 

याविषयी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पोलिसांनी त्या ठिकाणची तपासणी केली असता एका गायीची 2 शिंगे , चार पाय व कापलेल्या अवस्थेत धड मिळून आले... एक गाय त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात उभी राहून जीव वाचविणार्‍या देवदूत पोलिसांकडे व गोरक्षकांकडे पहात होती...बाहेरील बाजूस 1 गाय  कत्तलीसाठी बांधून ठेवलेली  होती. या दोन्ही गायींची पथकाने सुटका करून त्यांना त्रिमूर्ती कामधेनु गोशाळा, वडेश्वर येथे ठेवले आहे. 

या प्रकरणातील आरोपी अनिस शेख हा स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत असून त्याच्यासह अन्य आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती शिवशंकर स्वामी यांनी दरम्यान महाराष्ट्र सरकारला केली आहे.

देहूरोड : गोहत्या सुरू असलेल्या बेकायदा कत्तलखान्यावर धाड! कथित पत्रकारासह तिघे पोलिसांच्या ताब्यात!! (VIDEO) देहूरोड : गोहत्या सुरू असलेल्या बेकायदा कत्तलखान्यावर धाड! कथित पत्रकारासह तिघे पोलिसांच्या ताब्यात!! (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/२३/२०२२ ०७:५२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.