पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. यात शहरातील 7 अधिकारी व 7 कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यामध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी आहेत. त्यात महिला अधिकारी देखील आहेत.
आजवर एकूण 946 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
15 मे 2020 रोजी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एका कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा आकडा हळूहळू 946पर्यंत पोहोचला. चौघांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित 3 हजार 375 एवढे कर्मचारी आहेत. त्यातील 28 टक्के पोलिसांना आजवर कोरोनाचा संसर्ग झाला आहे
पिंपरी चिंचवडमधील 14 पोलिस कोरोनाग्रस्त
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ ०८:०१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: