देहूरोड : आपल्या पतीने आपणाला अश्लील चित्रफीत दाखवून अनैसर्गिक कृत्य केले तसेच, हुंड्यासाठी वारंवार शारिरीक व मानसिक छळ केला; अशी तक्रार एका महिलेने देहूरोड पोलीसठाण्यात शुक्रवारी दाखल केली आहे.
त्यावरून त्या महिलेचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 377, 354, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प, नाशिक येथे ऑगस्ट 2021 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला घडल्याचे महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.तिला तू काळी बुटकी आहेस असे हिणवून लग्नात सोने कमी दिले म्हणून शिवीगाळ केली. सासू व नणंद यांनी तिचे केस ओढले व मारहाण केली. वारंवार हुंड्याची मागणी करून मानसिक व शारीरिक छळ केला. पतीने इच्छेविरूद्ध अश्लील चित्रफीत दाखवून अनैसर्गिक कृत्य केले असेही फिर्यादीत म्हटले आहे.
महिलेचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ ०८:००:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: