Police e news

महाराष्ट्र पोलीस दलाचा 60 वा स्थापना दिवस लोणावळ्यात उत्साहात साजरा

लोणावळा : महाराष्ट्र पोलीस दलाचा 60 स्थापना दिवस लोणावळा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुरुकुल विद्यालयात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बँड पथकाने उत्कृष्ट वादनाचे सादरीकरण केले. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस आहे. 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. हा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पोलीस विभागाकडून साजरा केला जातो. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर, पोलीस उपनिरीक्षक अब्दुललतिफ मुजावर, लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, माजी नगरसेवक व पत्रकार विशाल पाडाळे, पोलीस कर्मचारी प्रवीण गोसावी, सदाशिव पिरगणवार, रमेश भिसे, प्रविण तायडे, विकास कदम यांच्यासह कर्मचारी, गुरुकुल शाळा समितीचे संचालक बापुलाल तारे व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस बँड पथकाने यावेळी देशभक्तीपर विविध गाणी वाद्यांच्या साहाय्याने सादर केली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी पोलीस निरीक्षक सीताराम डुबल व सर्व पोलीस कर्मचारी यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक डुबल म्हणाले सध्या देशात, राज्यात व आपल्या लोणावळा तसेच मावळ परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत याकरिता सर्व नागरिक, शिक्षक व विद्यार्थी वर्गाने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच शक्यतो गर्दीच्या जागी जाणे टाळावे.
महाराष्ट्र पोलीस दलाचा 60 वा स्थापना दिवस लोणावळ्यात उत्साहात साजरा महाराष्ट्र पोलीस दलाचा 60 वा स्थापना दिवस लोणावळ्यात उत्साहात साजरा Reviewed by ANN news network on १/०९/२०२२ १२:३७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.