Police e news

सांगवीतील घोलप महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

सांगवी : सांगवीतील बाबुराव घोलप महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकावर शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चार अनोळखी मुलांनी प्राणघातक हल्ला केला. मास्क लावण्यास सांगितल्याने आणि ओळखपत्र दाखविण्यास सांगितल्याने हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अवधेश रामप्रसाद यादव (वय 39) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून चार अज्ञात आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने आरोपींना तोंडाला मास्क लावण्यासाठी सांगितले तसेच, ओळखपत्राची विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच, डावा हात मोडला. -------
सांगवीतील घोलप महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला सांगवीतील घोलप महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला Reviewed by ANN news network on १/०९/२०२२ १२:३८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.