भोसरी : शास्त्री चौक, भोसरी येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता गोकुळ स्वीटस या दुकानाच्या मालकाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चार जणांनी दुकानदार व त्याच्या भावाला मारहाण करून चार हजार रुपये काढून घेतले आणि एका रिक्षाची तोडफोड केली. सूरज चुन्नीलाल चौधरी (वय १८, रा. संभाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन, शंकर आणि दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांचे भोसरीतील शास्त्री चौकात स्वीट मार्ट आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी दुकान बंद करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी दारूसाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने फिर्यादी यांना चावा घेतला, एकाने दुकानात दगड मारून नुकसान केले. फिर्यादीच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेतले. फिर्यादी यांचा भाऊ भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली.
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून दुकानदारास लुटले
Reviewed by ANN news network
on
१/०५/२०२२ ०८:४१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: