पिंपरी: पुणे बंगळुरू महामार्गावर रावेत येथे रविवारी पहाटे ४ वाजता चहा पिण्यासाठी थांबलेल्या मालमोटार चालक आणि क्लिनरला मारहाण करून एकाने चालकाकडील पाच हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटून नेला.किरण महादेव बनसोडे (वय ३३, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब तानाजी खरात (वय २१, रा. कोणी कोन्हूर, ता. जत, जि. सांगली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी हे मालमोटार चालक आहेत. रविवारी पहाटे ते थरमॅक्स कंपनीतून माल घेऊन जात होते. रावेत येथे ते चहा पिण्यासाठी थांबले. चहा प्यायल्यानंतर फिर्यादी आणि क्लिनर ट्रकमध्ये बसून निघत असताना आरोपी तिथे आला. आरोपीने शिवीगाळ व धमकी देत फिर्यादी आणि त्यांच्या हेल्परला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या खिशातील पाच हजार रोख रक्कम आणि २५ हजारांचा मोबाईल फोन आरोपीने जबरदस्तीने हिसकावला आणि पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रावेत येथे मालमोटार चालकाला लुटले
Reviewed by ANN news network
on
१/१२/२०२२ ०९:२५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: