निगडी : निगडी प्राधिकरण येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले.
राहुल संतोष चव्हाण (वय ३०, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री चव्हाण हे महापौर मैदान येथून आकुर्डी पोस्ट ऑफिसकडे जाणा-या रस्त्याने चालत जात होते. ते आर्किटेक्ट स्टुडिओ येथे आले असता काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन अज्ञात चोरटे तिथे आले. त्यातील एकाने फिर्यादी चव्हाण यांच्या गळ्यातील एक हजार ९०० रुपये किमतीची चांदीची चैन जबरदस्तीने ओढून घेतली.
दुस-या चोरट्याने चव्हाण यांच्या हातातील २१ हजार ४९० रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. तर तिस-या चोरट्याने पॅन्टच्या पाठीमागील खिशात हात टाकून ६०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर चोरटे महापौर मैदानाच्या दिशेने वेगाने दुचाकीवरून निघून गेले.
निगडी येथे तरुणाला लुटले
Reviewed by ANN news network
on
१/१२/२०२२ ०९:२७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: