Police e news

शिवसेना युवतीसेना अध्यक्षांवर जबरदस्तीने घर पाडण्यास चिथावणी दिल्याबद्दल गुन्हा दाखल

पिंपरी : युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख प्रतीक्षा घुले यांच्या सांगण्यावरून काही व्यक्तींनी आपणास जबरदस्तीने घराबाहेर काढून आपले घर पाडले अशी तक्रार एका महिलेने रामनगर बोपखेल येथील एका महिलेने भोसरी पोलीसठाण्यात नोंदविली असून पोलिसांनी त्यावरून आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. अनिता नंदकिशोर बिलोरीये (वय ५०, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित भिवाल, नीलेश भिवाल, विवेक लवेरा, सनी भिवाल, प्रियंका भिवाल, सोनू लवेरा, निकिता पिल्ले, प्रतीक्षा घुले (रा. बोपखेल) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी सनी भिवाल याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी घरात आले. तुमची वडिलोपार्जित जमीन डेव्हलपमेंटला दिली आहे. त्याबाबतच्या पॉवर ऑफ टर्नीवर गुपचूप सही कर. नाहीतर तुला जाळून टाकू, अशी आरोपींनी धमकी दिली. फिर्यादीने सही करण्यास नकार दिला. किचनमधील गॅस शेगडी फिर्यादीच्या अंगावर फेकून मारून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. आरोपींनी जेसीबी मशीनने फिर्यादीच्या घराच्या भिंती व संपूर्ण घर पाडले. फिर्यादीचा मुलगा अक्षय याने जेसीबी मशीन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याला विटा फेकून मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. प्रतिक्षा घुले यांनी या प्रकरणात आपला सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.
शिवसेना युवतीसेना अध्यक्षांवर जबरदस्तीने घर पाडण्यास चिथावणी दिल्याबद्दल गुन्हा दाखल शिवसेना युवतीसेना अध्यक्षांवर जबरदस्तीने  घर पाडण्यास चिथावणी दिल्याबद्दल गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ ०९:१३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.