Police e news

महिलेचा विनयभंग

रहाटणी: रहाटणी येथील एका महिलेच्या घरात घुसून दोघांनी तिचा मोबाईल फोन पळवून नेत तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी एक ते रविवारी (दि. ९) दुपारी बारा या कालावधीत घडली. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय २५, रा. रहाटणी), मंगेश माने (वय २१, रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलीच्या हातातून फिर्यादी यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. त्यानंतर फिर्यादी यांनी मोबाईल क्रमांकावर फोन केला असता आरोपींनी फिर्यादी महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला.
महिलेचा विनयभंग महिलेचा विनयभंग Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ ०९:०१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.