Police e news

पुरवठा अधिकारी, पत्रकार असल्याचे सांगून खंडणी उकळणारे अटकेत

महाळुंगे : पुरवठा अधिकारी आणि पत्रकार असल्याचे भासवून गॅसशेगड्या दुरुस्त करणा-यांना कारवाई करण्याची दमदाटी करत दरमहा हप्त्याची मागणी करणा-या दोघांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. प्रशांत माणिक पायगुडे (वय २५, रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर त्रिंबक नेहे (वय ५७, रा. प्राधिकरण मोशी), संदीप नानासाहेब बोर्डे (वय ३५, रा. रुपीनगर, तळवडे) यांना अटक करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून महाळुंगे परिसरातील गॅसशेगडी दुरुस्त करणा-या दुकानदारांकडे दोन व्यक्ती येऊन,पुरवठा अधिकारी व पत्रकार असल्याचे सांगून दुकानात गॅस सिलेंडर टाकी कशी काय ठेवली, तुमच्यावर कारवाई करावी लागेल. कारवाई टाळायची असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असा दम देऊन ५ हजार रुपये घेऊन तडजोड करत असल्याची तक्रार महाळुंगे पोलिसांकडे आली होती.असे कोणी पैसे मागण्यासाठी आल्यास माहिती द्यावी असे पोलिसांनी व्यापा-यांना सांगितले होते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी पायगुडे यांच्या दुकानात आरोपी आले. त्यांनी पुरवठा अधिकारी असल्याचे सांगून खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानात जाऊन ज्ञानेश्वर नेहे आणि संदीप बोर्डे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पुरवठा अधिकारी, पत्रकार असल्याचे सांगून खंडणी उकळणारे अटकेत पुरवठा अधिकारी, पत्रकार असल्याचे सांगून खंडणी उकळणारे अटकेत Reviewed by ANN news network on १/२०/२०२२ ०८:५१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.