Police e news

शेअर मार्केटमध्ये भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला फायदा होईल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना ८ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे (वय ४४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीचे संचालक जय मावजी, निजय मेहता, निकुंश शहा, निलेश वाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार १ सप्टेंबर २०२१ ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत रेनबो प्लाझा, पिंपळे सौदागर येथे घडला. फिर्यादी यांनी इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केली. त्या रकमेवर प्रत्येक महिन्याला फायदा करून देण्याचे आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांना दरमहा कोणतीही रक्कम दिली नाही. त्याउलत कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या अॅपवर बनावट व खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला. त्यातून फिर्यादी आणि अन्य लोकांची एकूण आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर मार्केटमध्ये भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक शेअर मार्केटमध्ये भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक Reviewed by ANN news network on १/२९/२०२२ ०९:१०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.