चिखली : मोरेवस्ती, चिखली येथे शनिवारी (दि. १) रात्री साडेआठ ते नऊ या वेळेत कपड्यांच्या दुकानात ४७ हजार रुपये असलेली पर्स एका अनोळखी महिलेने लांबवली. शाहीन बालम शेख (वय ३२, रा. मोरेवस्ती चिखली) यांचे मोरेवस्ती येथे फातिमा कलेक्शन लेडीज किड्स वेअर नावाचे कपड्यांचे दुकान आहे. या दुकानाच्या काउंटर खाली फिर्यादी यांनी पर्स ठेवली होती. त्या पर्समध्ये ४७ हजार रुपयांची रोख रक्कम होती. एका अनोळखी महिलेने ती चोरून नेली. यांनी याप्रकरणी शाहीन यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिखली येथे दुकानातून पर्स लांबवली
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ ०९:४०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: