बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे रविवारी सकाळी लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि ट्रक यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लातूर-औरंगाबाद ही बस लातूरहून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र या अपघाताची तीव्रता इतकी होती, की सहा जणांना जागीच प्राण गमवावे लागले.
सायगाव येथे एसटीचा भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ ०३:०१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: