Police e news

पिंपरीत राज्य गुप्तवार्ता आणि गुंडविरोधी पथकाचे कार्यालय होणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीतील मोकळा भूखंड राज्य गुप्त वार्ता विभागाच्या कार्यालयासाठी दिला जाणार असून आकुर्डी, गंगानगर येथील पांडुरंग काळभोर सभागृहातील हॉल आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाच्या कार्यालयासाठी देण्यात आला आहे. याशिवाय पोलीस गस्तीसाठी विविध सुविधांनी सज्ज असलेल्या १०० पल्सर स्मार्ट बाईक्स दिल्या जाणार आहेत. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून (पीसीएनटीडीए) महापालिकेला सेक्टर क्रमांक नऊ येथील मोकळी जागा मिळाली आहे. या जागेत बास्केट बॉल ग्राऊंड विकसित करण्यात आले असून क्लब हाऊस तयार करण्यात आला आहे. याशिवाय इतर मोकळी जागाही आहे. ही मोकळी जागा राज्य गुप्ता वार्ता विभागाच्या कार्यालयासाठी नि:शुल्क देण्यात येणार आहे. तसेच आकुर्डी, गंगानगर येथील पांडुरंग काळभोर सभागृहातील हॉल वैद्यकीय विभागाअंतर्गत मध्यवर्ती औषध भांडार विभागाला औषध ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या गुंडविरोधी पथकाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी जागा मिळण्याबाबत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग निर्धारीत करेल त्या दराने ही जागा भाड्याने देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलीस गस्तीसाठी १०० पल्सर या स्मार्ट बाईक्ससोबत दोन माईक, फ्लॅश लाईट, कॅमेरा, जीपीएस टॅकींग सिस्टीम, जॅमर होल्डर्स, हेल्मेट विथ हेल्मेट होल्डर अशी अत्याधुनिक सुविधांची मागणी केली आहे.कोरोना मास्क न वापरणा-या, विनाकारण फिरणा-या नागरिकांकडून वसुल करण्यात आलेल्या दंडातून पोलिसांना स्मार्ट बाईकसह इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी १ कोटी १० लाख रूपये खर्च होणार आहेत. शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी चाकण पोलीस ठाण्यातून म्हाळुंगे, देहूरोड पोलीस ठाण्यातून रावेत आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातून शिरगाव या स्वतंत्र चौक्यांचे पोलीस ठाण्यात रूपांतर होण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला. ४ जानेवारी २०२१ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली.आता शहराचे तिसरे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ करण्याचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठवला आहे. त्यात पुणे ग्रामीण मधील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर या पोलीसठाण्यांचा समावेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात करावा, अशी मागणी केली आहे.
पिंपरीत राज्य गुप्तवार्ता आणि गुंडविरोधी पथकाचे कार्यालय होणार पिंपरीत राज्य गुप्तवार्ता आणि  गुंडविरोधी पथकाचे कार्यालय होणार Reviewed by ANN news network on १/१०/२०२२ ०९:०७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.