पिंपरी : पिंपरी भाजी मंडई येथे शनिवारी दुपारी एका तडीपार गुंडाने त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाची गचांडी पकडून; शिवीगाळ करत शारीरिक झटापट केली.
पोलीस हवालदार संपत मच्छिंद्र खाडे यांनी या प्रकरणी शनिवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन शिवाजी सुर्वे (वय ३७, रा. भीमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला २१ सप्टेंबर २०२० रोजी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तो शहरात आला.ही माहिती मिळाल्यावर पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी तो भाजी मंडईजवळ उभा होता. त्याने पोलीस हवालदाराची गचांडी पकडून त्याच्याशी झटापट करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या गुंडाला अटक करण्यात आली.
तडीपार गुंडाने पकडली पोलिसाची गचांडी
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ ०९:०५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: