Police e news

दोघांवर कोयत्याने वार करणारा अटकेत

हिंजवडी : सोमाणी ड्रीम होम लेबर कॅम्प,गायकवाड नगर, हिंजवडी येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास एकाने दोघांवर कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अशोक प्रेमलाल बारमण (वय ४०, रा. गायकवाड नगर,पुनावळे) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. सरजू बली यादव (वय २८, रा. गायकवाड नगर, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड), राजेश्वर साकत अशी जखमींची नावे आहेत. सरजू यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अशोक हा गायकवाड नगर, पुनावळे येथील सोमाणी ड्रीम होम या बांधकाम साईटवर काम करत होता. त्याच साईटच्या लेबर कॅम्पमध्ये तो राहण्यास आहे. त्याला गावी जायचे असल्याने त्याने ठेकेदार तय्यापा पुजारी यांच्याकडे पैसे मागितले. पुजारी यांनी अशोकला पैसे दिले नाहीत. त्यावरून त्याने ठेकेदार पुजारी यांच्यासोबत हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करून लेबर कॅम्पमध्ये आला.लेबर कॅम्पमध्ये फिर्यादी सरजू त्याला समजावत होते. त्यावेळी अशोक याने सरजू यांना शिवीगाळ करून कोयत्याने हातावर मारून जखमी केले. त्यावेळी राजेश्वर साकत भांडण सोडविण्यासाठी आले असता अशोक याने राजेश्वर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दोघांवर कोयत्याने वार करणारा अटकेत दोघांवर कोयत्याने वार करणारा अटकेत Reviewed by ANN news network on १/०५/२०२२ ०८:४४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.